सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

छोटे लोग – छोटी सोच

केंद्र मंत्री मंडळाचा विस्तार झाला. आणि मोदी सरकार वर टिकास्त्रांचा विरोधकांनी भडिमार केला.
आमचे संपादकीय सं-जयचंद ह्यांनी राणेंवर हल्ला बोल केला. त्यांना जे खातं दिले आहे ते कमी आणि हीन दर्जाचे दिले गेले, असे ह्या जयचंदाचे बोल. आता सरकार भाजपाचे, विस्तार भाजपा करणार की जयचंदाला विचारुन करणार? अरे, जयचंद स्वतः चे सरकार बनवित असताना, आपल्या भावाची वर्णी नाही लावु शकला आणि हे निघाले, गावाला ज्ञान वाटायला. खरे म्हणजे सं-जयचंद ला आपली चूक कळली आणि बोंबलता येत नाही. कदाचित भाजपा-शिवसेना सरकार असते तर आज जयचंदाला सुद्धा कुठले तरी मोठे पद मिळाले असते आणि ही शक्यता नाकारता येत नाही, हे शल्य स्वस्थ बसू देत नाही.म्हणुन मोदींवर टिकास्त्र. आणि राणेंवर वैफल्यग्रस्त वाक्बाण.
बरे, गंमत अशी की जरंडेश्वर घोटाळा चौकशी सुरू झाली आणि शहांना “सहकार” खात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला. ह्या पार्श्वभूमीवर सर्व देशांतील राज्ये शांत आहेत पण महाराष्ट्रात आगडोंब उसळला आहे. ह्या विषयावर चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. आज पर्यंत सहकार म्हणजे सहकाराने भ्रष्टाचार असा अर्थ आपले महाराष्ट्रातील सद्य सत्ताधारी पक्षे काढत असावीत असे वाटते.
मात्र अमित शहांनी सहकार क्षेत्राचा आवाका जाणला आणि लगेच कामाला लागले. त्यांनी सहकार मंत्रालयाचा पदभार सांभाळण्या अगोदर, सर्व सहकार क्षेत्रातील मान्यवरांना भेटण्याचा सपाटा लावला.
चुकलात वाचकहो !!!! ते समयाधीशांना नाही भेटले तर इफ्को, कृभको ह्या कंपन्यांनी सहकार क्षेत्रात उतरून “बियाणे उत्पादन आणि सेंद्रिय शेती” या क्षेत्रात कामे करावीत ह्या साठी प्रयत्नशील झाले. एवढेच नाही तर अडतीस हजार पडीक शेतीची जागा सुद्धां त्यांनी वापर करून देण्याबाबत निर्देश दिले. केवढी विलक्षण कर्तव्याप्रती बांधिलकी.
आणि इकडे समयाधीश वक्तव्य करुन राहिले की राज्याचे आपले नियम आहेत, त्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. साहेब, तुम्ही स्वतः सांगताहात की राज्याचे नियम कसे गैरप्रकारांनी हाताळता येतात.
अमित शहांनी कधीतरी तोंडातून शब्द काढला की जरंडेश्वर ची चौकशी करीन वगैरे वगैरे….? नाही मग तुम्ही कशापायी बोंबलून सांगताय आणि लक्ष वेधताय सगळ्यांचं, या..या….या….सगळे आणि काका-पुतण्याचा कारभार पहा, त्यात किती किती – कोणा कोणाला? पहा. पहा… पहा….
त्याऐवजी मस्त पैकी एक विधान ठोकुन दिले असते की मी सहकार क्षेत्रातला दिग्गज आहे अमित शहा. अडलं नडलं माझ्याकडे या मी मोकळा आहे तुम्हाला “सहकार क्षेत्रातले” बारकावे मार्गदर्शित करायला. पण ह्यांचे आपले चोर के दाढी मे तिनका. पैशांनी माणूस अब्जोपती असेल आणि विचारांची कुवत आणि कर्म जर सामान्य जनतेचा पैसे हडपुन जर शेखी मिरवंत असेल तर हे लोकं असेच कायमची मनात भिती ठेवत छोटे लोग – छोटी सोच वाले जगंत आपल्या कुटुंबाचं भलं करंत, जगत असतात.

भाई देवघरे

Leave a Reply