धुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

चंद्रपूर: १3 जुलै- चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे सोमवारी रात्री उशिरा धुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. मध्यरात्री रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कुटुंबियांनी घरातील विजेचे जनित्र सुरू केले. मात्र, घराची दारे-खिडक्या बंद असल्याने जनरेटरच्या वायूची गळती होऊन धूर घरात पसरला. या दुर्घटनेत घरातील ७ जण बेशुद्ध झालेत. या पैकी रमेश लष्कर, अजय लष्कर, लखन लष्कर, कृष्णा लष्कर, पुजा लष्कर आणि माधुरी लष्कर यांचा मृत्त्यू झाला.
शेजाऱ्यांना पोलिसांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार स्वप्निल धुळे यांनी पोलिस पथक घेऊन घटनास्थळ गाठले व घराचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला व लष्कर कुटुंबियांना तात्काळ डॉ. विश्वास झाडे यांच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यापैकी ६ लोकांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. १० दिवसांपूर्वीच या कुटुंबात मंगल कार्य झाले होतेे. मात्र, अचानक काळाने घाला घातल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Leave a Reply