अमरावती:१3 जुलै- अमरावती जिल्हा एन.एस.यु.आय.च्यावतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालवीय चौक ते इर्विन चौकपर्यंत दोरखंडांनी कार ओढून ‘कार लोटो- कार खिंचो’ आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार सत्तेत आले. परंतु, ते महागाईवर नियंत्रण ठेऊ शकले नाही, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांनी केले. यावेळी प्रामुख्याने निलेश गुहे, पंकज मोरे, सागर देशमुख, राहुल येवले, सागर यादव, योगेश बुंदेले, गुड्डू हमीद, अमोल इंगळे, कृष्णा देशमुख ,तन्मय मोहोड़, नीरज कोकाटे , विवेक निस्ताने ,आदित्य साखरे व इतर सदस्य उपस्थित होते.
एनएसयुआयचे ‘कार लोटो- कार खिंचो’ आंदोलन
- Post author:Panchnama
- Post published:July 13, 2021
- Post category:विदर्भ
- Post comments:0 Comments