अशोक शिंदे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून कॉग्रेसमध्ये जाणार, पटोलेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश

मुंबई: १3 जुलै- शिवसेनेतील अंतर्गंत वाद व पक्षातील वरिष्ठ नेतृत्वानं योग्य ती दखल न घेतल्यानं वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदार संघाचे सेनेचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार आणि शिवसेना नेते अशोक शिंदे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आज मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अशोक शिंदे पक्ष काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
मागील एक वर्षांपासून सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख माजी खा अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. त्यातच गुढे यांनी मागील आठवड्यात येथे पत्र परिषद घेऊन स्पष्ट शब्दात शिंदे यांचा विषय शिवसेनेतून संपला असल्याचे सांगून, एक प्रकारे शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
दरम्यान, अशोक शिंदे यांनी मुंबईत जाऊन पक्षनेतृत्वाकडे या बाबत न्याय मागितला असता, सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नाही. परिणामी संपर्कप्रमुख शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी पटोले यांनी त्यांना काँग्रेस पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.

Leave a Reply