अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला नाना पटोलेंनी दिला मदतीचा हात

नागपूर : १३ जुलै – काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रस्त्यात जखमी पडलेल्या एका अपघातग्रस्त दुचाकीस्वराला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल करत मदतीचा हात दिला आहे. उमेश दुबे असे त्या जखमी इसमाचे नाव आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नाना पटोले यांनी केलेल्या या मदतीमुळे उमेश दुबे यांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना प्राथमिक उपचार मिळाले. मात्र, उमेश हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते रेल्वे त कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले
नाना पटोले हे कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपूर जिल्ह्यातील रामटेकला जात होते. तेव्हा एका दुचाकीचा टायर फुटल्याने, उमेश दुबे नामक इसम यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. ज्यामुळे उमेश गंभीर जखमी झाले होते. ते रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून असल्याचं नाना पटोले यांना लक्षात येताच त्यांनी आपली कार थांबवली. जखमी इसमाची चौकशी केल्यानंतर ते रेल्वे त कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. उमेश दुबे यांना गंभीर दुखापत झाल्याने, नाना पटोले यांनी त्यांना स्वतःच्या गाडीतून रामटेक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. नाना पटोले स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले होते.

Leave a Reply