नयना गुंडे गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी

गोंदिया: १२ जुलै- पुणे येथील यशदाच्या उपमहासंचालक नयना गुंडे यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. गुंडे या जिल्ह्याच्या दुसऱ्या महिला जिल्हाधिकारी आहेत. यापुर्वी कादंबरी बलकवडे या गोेंदियाच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी होत्या.
राज्यसरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने यशदा, पुणे येथील उपमहासंचालक नयना गुंडे यांची गोंदिया जिल्हाधिकारी या रिक्त पदावर बदली करण्यात आल्याचे पत्र अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी काढले आहे. गुंडे यांनी यापुर्वी पीएमपीएल पुणे, वर्धाच्या सीईओ, नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर काम केले आहे.

Leave a Reply