जावडेकर, रविशंकर प्रसाद होणार भाजपाचे उपाध्यक्ष

नवी दिल्ली: १२ जुलै- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी मंत्रिपदाचा राजीनामा देणारे रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी १२ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. यातील प्रसाद आणि जावडेकर यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपद, तर डॉ. हर्षवर्धन व इतर नेत्यांना निवडणूक होणार असलेल्या पाच राज्यांमध्ये प्रभारी म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
पुढील वर्षी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहेत. हे लक्षात घेत रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल निशंक आणि डॉ. हर्षवर्धन यांच्यासह काही नेत्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी यापूर्वीही भाजपात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या आहेत.

Leave a Reply