उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज पडल्याने ६८ लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली: १२ जुलै-उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज पडल्याने ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या घटनेमुळे दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात वेग-वेगळ्या भागात वीज पडल्यामुळे आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराजमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. कानपूर देहातमध्ये पाच तर कौशंबीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे फिरोझाबादमध्ये तीन आणि उन्नाव तसेच चित्रकूटमध्ये प्रत्येक दोन जणांना वीज पडल्याने मृत्यू झाला. तसेच राजस्थानमधेही वीज पडल्यामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी, राज्यातील वेगवगळ्या भागांमध्ये वीज पडल्यामुळे जयपूरमध्ये ११ धौलपूरमध्ये ३ , कोटा ४, झालावाड १ आणि बारांमध्यें देखील एकाचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशात देखील वीज पडल्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. श्योपूर आणि ग्वाल्हेर जिल्ह्यात वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply