महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना अभाविपचा घेराव

यवतमाळ: ११ जुलै- अभाविपने महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात घेराव केला. यवतमाळच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तिसरे वर्ष पूर्ण झाले आहे. आजच्या स्थितीत या महाविद्यालयात किमान ४५ प्राध्यापकांची आवश्यकता असताना केवळ एकच नियमित प्राध्यापक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, याकडे अभाविपने महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले.
दहावी व बारावी निकालाबाबत भूमिका स्पष्ट करून संभ्रम दूर करावा, सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा, कृषी व वैद्यकीय महाविद्यालयांचे भरमसाठ शैक्षणिक शुल्क कमी करावे, ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलाच नाही त्यांचे शुल्क आकारले जाऊ नये, या मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली नाही, परंतु परीक्षा शुल्क घेण्यात आलेले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तत्काळ परत करण्यात यावे. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील यांचा मृत्यू झाला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने घेतलेला निर्णय सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू करावा, अशी मागणी अभाविपने केली. या सर्व मागण्यांचे निवेदन देते वेळी अभाविपचे नगरमंत्री पीयूष पंचबुद्धे, नगर सहमंत्री स्वप्निल राठोड, यश ढोंग, रोहित वर्घट, आदित्य दांडेकर, साक्षी कोंडोलीकर, मानसी बोनगिरवार, निधी पांडे, तन्मय काळे उपस्थित होते.

Leave a Reply