मुंबई: १० जुलै- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा धागा पकडत भाजपाने “नानाजी, काय तुमची अवस्था?”, असं म्हणत नाना पटोले यांना चिमटा काढला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा लोणावळ्यात मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. नाना पटोले यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत नाना पटोले यांना टोला लगावला आहे.
नानाजी काय तुमची अवस्था? काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करीत आहेत. ना सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला! असं चित्र आहे हे, अशी कोपरखळी उपाध्ये यांनी लगावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र, या सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसची नाराजी सातत्याने बाहेर पडताना दिसत आहे.