देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेऊन नगरसेवकांना दिला विजयाचा कानमंत्र

नागपूर : ११ जुलै – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपने नागपुरातील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरसेवकांना निवडणुकीचा कानमंत्र दिला.
नागपूर मनपात गेल्या तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे, आगामी मनपा निवडणूक जिंकण्याचीही भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली. दरम्यान, आम्ही नागपूर मनपा निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

Leave a Reply