आ. संजय गायकवाड, खा. प्रतापराव जाधव यांच्यावर कारवाई करा: प्रा. जोगेंद्र कवाडे

बुलढाणा:१० जुलै- आ. संजय गायकवाड ज्या सभागृहात ते बसतात त्या सभागृहात कायदे बनतात. कायद्याचा सन्मान राखण्याऐवजी त्यांनी चिंतोडा प्रकरणात अँट्रॉसिटीबद्दल केलेले वक्तव्य कायदा पायदळी तुडवण्याचा प्रकार असून, मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय गायकवाड यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा बुलडाण्यात ५० हजार लोकांचा मोर्चा काढू असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांंनी दिला. प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, खा. प्रतापराव जाधव यांनी चिंतोडा येथे जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले.या दलित लोकांजवळ पैसा येतो कोठून, असे म्हणणाऱ्या खा. प्रतापराव जाधव यांनी जमविलेली संपती कोठून आली.? त्यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी.
खामगावच्या अंबिकापूरमध्ये वाघ आणि हिवराळे कुटुंबात जुने वाद होते. त्यातून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही कुटुंबातील सदस्य जखमी झाले होते. यानंतर संजय गायकवाड हे वाघ कुटुंबाच्या सांत्वनासाठी गावात गेले असताना त्यांनी तिथं काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप सध्या होत आहे.
प्रा. कवाडे पत्रपरिषदेत म्हणाले, की बुलडाणा जिल्हा सुसंस्कृत जिल्हा आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या पावन भूमीतील आमदारांचा आदर्श हा छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे. सामजस्यांची भूमिका घेण्याऐवजी आ. गायकवाड, खा. जाधव यांनी एकतर्फी व चिथावणीखोर वक्तव्य केल्याने हे प्रकरण वाढले. पोलिसांनीसुद्धा दबावाखाली येवून पिढीत हिवराळे कुटुंबीयांवर गुन्हे दाखल केले हा दलितांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असून, अशा धमक्यांना आम्ही भीणार नाही असेही प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले.

Leave a Reply