फायझरने केली तिसऱ्या बुस्टर लशीच्या परवान्यासाठी मागणी

न्यू यॉर्क: १० जुलै- जगातील अनेक लोकांना कोरोना प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी अजून, पहिली मात्राही मिळाली नसताना, फायझरने तिसऱ्या बुस्टर म्हणजे वर्धक लशीच्या परवान्यासाठी मागणी केली आहे. कोरोना प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी बारा महिन्यांनी लशीची तिसरी मात्रा देणे शक्य व्हावे, या हेतूने अमेरिकेतील फायझर कंपनी पुढील महिन्यात परवानगीसाठी अर्ज करणार आहे.
अनेक देशातील संशोधनानुसार कोविड -१९ लशी या डेल्टा विषाणूविरोधात संरक्षण देत आहेत. आता, हा विषाणू जगात पसरला असून, अमेरिकेत काही जणांना हा संसर्ग झाला आहे. फायझर लशीच्या दोन मात्रा आवश्यक असून त्यामुळे करोना विषाणूविरोधात प्रतिपिंड तयार होतात. डेल्टा विषाणू विरोधातही यात प्रतिपिंड तयार होतात. कालांतराने प्रतिपिडांची संख्या कमी होत असते. फायझरचे मिलाएल डोल्टसन यांनी सांगितले, की तिसऱ्या लशीच्या मात्रेनंतर व्यक्तींमध्ये प्रतिपिंडांचे प्रमाण पाच ते दहा टक्के वाढत असते. त्यामुळे वर्धक लस मात्रेची गरज आहे, असे फायझरचे म्हणणे आहे.

Leave a Reply