नागपूर : ७ जुलै – मिहानमध्ये पतंजली फूड व हर्बल पार्कच्या उत्पादनाला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरुवात करा, अन्यथा कारवाई करू, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने दिल्याची माहिती एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली.
कपूर गुरुवारी नागपुरातील मिहान प्रकल्पाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी पतंजली फू ड व हर्बल पार्कची पाहणी के ली. यावेळी त्यांनी विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाला भेट दिली. तसेच केंद्रीय सुविधा केंद्रातील आयटी क्षेत्राशी कं पन्यांचा आढावा घेतला. सेझबाहेर हॉस्पिटल, नर्सिग आणि हॉटेल उद्योगांना भूखंड उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याविषयी देखील माहिती घेतली. सध्या येथे एक नर्सिग हॉस्टिपलने भूखंड मागितला आहे. परंतु हॉटेल उद्योजकांनी प्रतिसाद दिलेला नाही. पतंजलीच्या प्रकल्पाविषयी बोलताना दीपक कपूर म्हणाले, ९५ टक्के काम झाले आहे. बहुतांश यंत्रसामग्री बसण्यात आली आहे. एमएडीसीने पतंजलीला ३१ डिसेंबपर्यंत उत्पादनास सुरुवात करण्याची सूचना के ली आहे. या मुदतीत उत्पादनास सुरुवात न के ल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही के ली जाईल.
मिहानमधील नॉन-सेझमध्ये पतंजली समूहाने २३० एकरचा भूखंड घेतला आहे. परंतु दिलेल्या मुदतीत उत्पादन सुरू केले नाही.
रामदेव बाबा यांच्या पंतजली समूहाने विदर्भातील संत्रा उत्पादक आणि इतर शेतकऱ्यांना लाभ होईल म्हणून मिहानमध्ये सप्टेंबर २०१६ ला जमीन घेतली. सहा महिन्यात उद्योग सुरू करण्यात येणार होते. या प्रकल्पात पतंजली उद्योग समूहाने सुमारे ५०० कोटींची गुंतवणूक करून, पायाभूत सुविधा उभारली आहे. या प्रकल्पाच्या प्रक्रियेसाठी संयत्रे आयात केलेली आहेत. पण, आर्थिक अडचणीमुळे पुढील कामे ठप्पे झाली आहेत. दरम्यान, यापूर्वी देखील एमएडीसीने उत्पादन सुरू करण्यासंदर्भात पतंजली समूहाला नोटीस बजावली होती. त्याचे काय झाले, हे उघड झालेले नाही.