उद्धवा प्राण तळमळला !
कालपरवा शासनाने पाच उर्दू भाषा भवन बांधण्याचा निर्णय घेतला !
आणि आमच्या आश्चर्याला पारावार नाही उरला !
अजानची स्पर्धा आणि चिष्तीच्या नावानन्तर एवढेच होते उरले !
ते बघून आमच्या नजरेचे पारणे होते फिटले !
कल्पनेच्या काळोखात आम्ही पाहिले,
मराठी बाण्याचे पंचप्राण त्या पाच भवनांच्या पायव्यात चिणले गेले !
मराठी अस्मितेच्या अंत्ययात्रेचे चित्र
क्षणभर डोळ्यापुढे तरळून गेले !
हिंदुहृदयसम्राटांच्या आत्म्याचा स्वर्गात होणारा तळतळाट आम्हाला दिसला !
मराठी बाण्यासाठी लाठी गोळी खाल्लेल्या दिवंगत सैनिकांचा जमाव
आम्ही आकाशात कुजबुजताना पहिला !
सारे एका सुरात देवाला आळवत होते —-
” याला सुबुद्धी दे रे देवा ! “
” याला सुबुद्धी दे रे देवा ! “
माय मराठीच्या डोळ्यातून गंगायमुना वहात होत्या !
आणि आर्त स्वरात ती म्हणत होती,
” उद्धवा प्राण तळमळला !”
” उद्धवा प्राण तळमळला !”
कवी -- अनिल शेंडे .