भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा नृत्य करत असलेला व्हिडीओ व्हायरल

भोपाळ : ९ जुलै – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच विविध वादामुळे चर्चेत असतात. त्यांचा नृत्य करत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन मुलींच्या लग्नातील आहे. न्यायालयात प्रकृती अस्वस्थ असल्याचे प्रज्ञा सिंह यांनी सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते नरेंद्र सलूजा यांनी व्हिडिओ पोस्ट करत ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते नरेंद्र सलूजा यांनी ट्विटमध्ये म्हटले, की आमच्या बहीण भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर या बास्केट बॉल खेळत असताना आणि कुणाचीही मदत न घेताना नाचते. तेव्हा खूप आनंद होतो. आजपर्यंत त्यांना व्हीलचेअर पाहिले आहे. मात्र, भोपाळ स्टेडियमवर त्या बास्केटबॉल खेळताना दिसल्यानंतर आनंद झाला. आजपर्यंत माहित होते, की काहीतरी जखम झाल्यामुळे त्यांना चालता येत नव्हते. ईश्वराने त्यांना चांगले आरोग्य देवो.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना पराभूत केले. प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. त्या सध्या जामिनावर आहेत. २०१७ मध्ये जामीन मिळण्यापूर्वी त्या ९ वर्षे तुरुंगात होत्या. मालेगाव स्फोटात ६ लोकांचा मृत्यू तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असणाऱ्या खासदार प्रज्ञा सिंह यांनी एका गरीब कुटुंबातील दोन मुलींचा विवाह लावून दिला आहे. चंचल आणि संध्या असे त्या दोन मुलींचे नाव आहे. प्रज्ञा सिंह यांच्या निवासस्थानी लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. मी आनंदाने घरातून दोन्ही मुलींची पाठवणी करत आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. लग्न समारंभात महिला डान्स करत असताना पाहून त्या नाचण्यापासून स्वत: ला रोखू शकल्या नाही. प्रज्ञा यांनीही त्याच्यासोबत ताल धरला आणि ‘ठुमके’ही लगावले होते.

Leave a Reply