कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

अकोला : ९ जुलै – राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर नजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रकच्या भीषण अपघात चौघांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री 1 च्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर अकोला ते बाळापूर दरम्यान रात्री एक वाजताच्या सुमारास शेगाव कडून येत असलेल्या एम एच 37 जी 8262 ही कार वाशिमकडे जात असतांना ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कार मधील तीन जणांचा जागीच तर एकाचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला.
मृतकांमध्ये वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी(कुटे) येथील धनंजय नवघरे,विशाल नवघरे,मंगेश राऊत आणि शुभम कुटे यांचा समावेश आहे. अपघातात ठार झाले तरुण हे ३० वर्षाच्या आतील आहेत. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे घटनस्थळी दाखल झाल्यानंतर मृतकांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते, अपघात एवढा भयंकर होता की मृतकांमधील तिघे कार पूर्णपणे दबले गेले होते. तर एकाला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी अकोला सरोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या प्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply