२४ तासात जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये ५ दहशतवादी ठार

श्रीनगर : ८ जुलै – जम्मू काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. सुरक्षा जवानांनी कुलगाम आणि पुलवामा येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सुरक्षा जवानांना कुलगाम जिल्ह्याकील झोदार परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसर सील करत सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.
सर्च ऑपरेशन सुरु असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला आणि चकमकीला सुरुवात झाली. चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
दुसरीकडे पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि हंडवारा येथे एक दहशतावादी ठार करण्यात आला आहे. हिजबूलचा टॉप दहशतवादी मेहरजुद्दीन उर्फ उबैद हंडवारामधील चकमकीत मारला गेला आहे. आतापर्यंत गेल्या २४ तासात एकूण पाच दहशतवादी ठार करण्यात आले आहेत.

Leave a Reply