हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

शिमला:८ जुलै- हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते वीरभद्र सिंह यांचे आज पहाटे निधन झाले आहे. ते ८७ वर्षाचे होते. गेल्या दोन महिन्यापासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. वीरभद्र सिंग यांच्यावर शिमल्याच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांनी दोनवेळा कोरोनावर मात केली होती. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला.
वीरभद्र सिंह यांचा जन्म राजघराण्यात झाला होता. वीरभद्र सिंह हे नऊ वेळा आमदार, तर पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिवाय सहा वेळा ते मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी केंद्रात मनमोहन सिंगांच्या नेतृत्वात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळलं होते. सध्या ते सोलन जिल्ह्यातील अरकी येथील आमदार होते.

Leave a Reply