नवी दिल्ली: ८ जुलै- नवी दिल्लीतील लोधी रोडवरील सीबीआय मुख्यालयात आज गुरुवारी भीषण आग लागली. पार्किंगच्या इलेक्ट्रॉनिक खोलीत ही आग लागली. आगीनंतर धूर वाढत असल्याचे पाहून सर्व अधिकारी तत्काळ इमारतीतून बाहेर आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु, ही आग कशामुळे लागली याबद्दल माहिती मिळाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज लावल्या जात आहे. या आगीत कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही.
ट्रान्सफॉर्मर आणि वातानुकूलन प्लांटच्या खोल्यांमध्ये ही आग लागल्याची माहिती आहे. सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे सीबीआय इमारतीत जनरेटरमधून धूर बाहेर येत होता. आगीने मालमत्तेचे नुकसान झाले नाही. धूरानंतर स्वयंचलित स्प्रिंकलर यंत्रणा सक्रिय झाली होती.