राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा – उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश

मुंबई : ८ जुलै – शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. यावेळी ‘तुम्ही आघाडी किंवा युती होणार का? याची चिंता करू नका. तुम्ही फक्तं जनतेची कामं करा. राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा’ असा आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.
कोविड 19 संसर्ग काळात तुम्ही चांगलं काम केलंत. अशीच चांगली कामं पूढेही करत रहा. शाखा प्रमुखांनी प्रत्येक गाव करोनामुक्तं करा. महापालिका , नगरपालीका, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जनतेसाठी कामं करा. आता आपण सत्तेत आहोत. सत्तेत असताना तुम्ही शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी, जनतेमध्ये जाऊन कामं केली पाहीजेत. राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नं करा… मी तुमच्या पाठीशी आहे.’
शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या उपस्थितीत ही संघटनात्मक बैठक संपन्न झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शिवसेना राज्यभर “शिवसंपर्क मोहीम” सुरू करणार आहे. या अंतर्गत राज्यभर ही मोहीम येत्या 12 ते 24 जुलैपर्यंत राज्यात राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
“माझं गाव, कोरोना मुक्तं गाव” यासाठी प्रत्येक घरा घरामधून शाखा प्रमुखांनी जनतेची माहिती घ्यावी. लसीकरण केलंय की नाही, त्यांच्या इतर काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत की नाही. याचीही माहिती घ्या’ असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
तसंच, ‘तुम्ही आघाडी किंवा युती होणार का.? याची चिंता करू नका. तुम्ही फक्तं जनतेची कामं करा. कोविड 19 संसर्ग काळात तुम्ही चांगलं काम केलं. अशीच चांगली कामं पुढेही करत रहा. शाखा प्रमुखांनी प्रत्येक गाव कोरोनामुक्तं करा. महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जनतेसाठी कामं करा. आता आपण सत्तेत आहोत. सत्तेत असताना तुम्ही शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी, जनतेमध्ये जाऊन कामं केली पाहिजेत. राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नं करा, मी तुमच्या पाठीशी आहे.’अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी घातली.

Leave a Reply