दमदार पावसाने नागपूरकरांची झाली दैना, रस्त्यावर साचले गुढगाभर पाणी

नागपूर : ८ जुलै – गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नागपूर शहरात आज जोरदार हजेरी लावली. सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. रस्त्यांवर चक्क गुडघाभर पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. तसेच सखल भागांत असलेल्या सोसायटी आणि घरांतही पावसाचे पाणी शिरले.
शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले साचले. रामदास पेठ, धरमपेठ, शंकर नगर, शिवाजी नगरसह अनेक भागातील पाणी साचल्याने दृश्य पाहायला मिळत आहे. रामेश्वरी, पारडी, भरतनगर, कळमना, प्रभाग क्रमांक 1 हुडको कॉलनी भागात अनेक घरात पाणी शिरल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शरले असून स्थानिक नगरसेवकांचे लक्षच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागपूर शहरातील रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली. काही ठिकाणी रस्त्यांवर चक्क कमरे इतकं पाणी साचल्याचंही समोर आलं आहे. एकूणच या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांवर टीका केली आहे.

Leave a Reply