‘डॅडी’ अरुण गवळीची ‘फर्लो’साठी उच्च न्यायालयात धाव

नागपूर:८ जुलै- अंडरवर्ल्ड डॉन ‘डॅडी’ ऊर्फ अरुण गवळीने २८ दिवसांची संचित रजा मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर तीन आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
अरुण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीने संचित रजा मिळावी म्हणून कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज खारीज करण्यात आला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.
याप्रकरणी न्या. व्ही. एम. देशपांडे व न्या. अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत यावर राज्य सरकारला तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. गवळीतर्फे अँड. मीर नगमान अली, तर राज्य सरकारतर्फे अँड. एम. ए. बरबडे यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply