वाघाच्या हल्ल्यात शेतकरी आणि गुराखी ठार

चंद्रपूर:७ जुलै- शेतामध्ये काम करायला गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील हळदा परिसरात घडली. मोतीराम नागोजी गरमाले (वय ६२) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी ते आपल्या शेतात गेले होते. मात्र, तेव्हापासून ते बेपत्ता होते. आज बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे २४ तासांपूर्वी एका गुराख्याला वाघाने ठार केले होते.
गुरे चराईसाठी गेलेल्या ४२ वर्षीय गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्यास ठार केले. ही घटना ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत आलेवाही कक्ष क्रमांक ७०३च्या संरक्षित वनक्षेत्रात घडली. रमेश वाघाडे असे मृतकाचे नाव आहे.

Leave a Reply