वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

तिसरी लाट !

सध्या देशात तिसऱ्या लाटेच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे !
कुणी शंभर कुणी दोनशे बेड्सची हॉस्पिटल्स बनवून, सजवून तयार ठेवत आहेत !
इतकी मेहनत केल्यानंतर ,इतका पैसा ओतल्यानन्तर , त्या लाटेला तर
यावच लागेल !
औषधी कँपन्यांच्या, हॉस्पिटल्सच्या, डॉक्टरांच्या सहकारी पद्धतीने , सेवाभावी वृत्तीने (!) , केलेल्या कार्याला तिलाही दाद द्यावीचलागेल!
नाहीच काही तर , लोकलाजेस्तव तरी तिला यावच लागेल !
म्हणून माझ्या बांधवांनो तुम्हीही
सावध रहा ! कारण —-
ही लाट, बिट काही आलीच नाही तर
ही सर्वशक्तिमान मंडळी तिला खेचून आणणारच आहेत !
तुमच्या माझ्या छकुल्यांच्या जीवांशी, म्हणजेच देशाच्या भविष्याशीही खेळणारच आहेत !
त्यांचं उखळ पूर्ण पांढरं करणारच आहेत !
म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो —
सावधान ! सावधान ! सावधान !

          कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply