रुपाली चाकणकर यांचा राणा पती-पत्नींवर हल्लाबोल

मुंबई : ७ जुलै – बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, असा जहरी वार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राणा पती-पत्नीवर केला आहे. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलंय तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला. याच पार्श्वभूमीवर चाकणकरांनी राणा पती-पत्नीवर शरसंधान साधलं आहे.
रूपाली चाकणकर सातत्याने म्हणजेच संधी मिळेल तेव्हा नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र डागत असतात. पाठीमागच्या महिन्यात हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करुन त्यांना दणका दिला. तर काल विधिमंडळ अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला. हाच धागा पकडत घालत चाकणकर यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केलाय. “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी-बबली निघाले”, अशा शब्दात चाकणकर यांनी नवनीत आणि रवी राणांवर तोफ डागलीय.
महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन काल संपन्न झालं. हे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने गाजवलं. विरोधक असलेल्या भाजपला ठाकरे सरकारने बॅकफूटवर ढकललं. यात मॅन ऑफ द मॅच ठरले ते कोकणातले भास्कर जाधव… भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करून पहिल्या दिवशीच सत्ताधारी विरोधकांवर हावी झाले… दुसऱ्या दिवशीही 12 आमदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय भाजपने घेतला. यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपने प्रति विधानसभा भरवली. या प्रती विधानसभेतही मोठा गोंधळ आणि राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
याच दरम्यान आमदार रवी राणा यांनी विधानसभेत एन्ट्री केली आणि त्यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोरचा राजदंड पळवला. “या राज्यात शेतकऱ्यांचे, कामगारांचे, महिलांचे, ओबीसी आणि मराठा बांधवांचे प्रश्न ऐरणीवर आहेत… त्यावर आपण चर्चा करावी…सत्यासंदर्भातलं माझं निवेदन तात्काळ स्वीकारा…” असं तालिका अध्यक्षांना रवी राणा म्हणाले.. त्यावर तालिका अध्यक्षांनी देखील तितकीच आक्रमक भूमिका घेत, “अध्यक्ष थेट निवेदन स्वीकारत नाहीत… तुमचं निवेदन खाली जमा करा…” असं सांगत विधिमंडळात सर्व घटकांवर चर्चा होत आहे, तुम्ही सहभाग नोंदवा, तुम्हाला पुरेपुर संधी दिली जाईल, पण स्टंट बाजीला येथे कुठला थारा नाही…. तुम्ही जरी राजदंड पळवला तरी कामकाज थांबणार नाही” असं जाधवांनी ठणकावून सांगितलं…!

Leave a Reply