मंगळूरपीर शहरात दोन गटात तुफान हाणामारी

वाशिम : ७ जुलै – जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. मंगरुळपीरच्या मण्यार चौकात सकाळी काठ्या व लोखंडी रॉडसह दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या हाणामारीमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पोलिसांनी घटनेचा कसून तपास सुरू केली आहे. मंगरुळ पीर शहरातील दोन गटात वाद होऊन वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीनुसार, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती मंगरुळ पीर येथील ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी दिली आहे.

Leave a Reply