प्रीतम मुंडे यांची मंत्रिपदाची संधी हुकली

मुंबई : ७ जुलै – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कुणा-कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातून चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार हे आता निश्चित झाले आहे. पण, बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांची संधी मात्र हुकली आहे. खुद्द पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून या वृताला दुजोरा दिला आहे.
प्रीतम मुंडे यांनी मंत्रिपद मिळणार अशी शक्यता होती. पण, त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. मराठवाड्यातून भागवत कराड यांनी मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. पंकजा मुंडे या नवी दिल्ली दाखल झाल्यात असे वृत्त दाखवण्यात आले होते. पण, पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.
‘खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत’ असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
ओबीसी नेतृत्व कायम राखण्यासाठी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाईल, असं समिकरण तयार झालं होतं. पण, त्यांच्या ऐवजी मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद दिले जाणार हे निश्चित झाले आहे. भागवत कराड हे वंजारी समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे घराणेशाहीला थारा न देता नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर राहिले होते. त्यांची राज्यसभेत खासदार म्हणून निवड झाली आणि आता थेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे, प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवून खासदारकीची दुसरी टर्म पूर्ण करत आहे.

Leave a Reply