पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाची पोलीस स्टेशनवर दगडफेक

यवतमाळ : ७ जुलै – यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथे पोलिसांच्या मारहाणीत एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाने पोलीस स्टेशन आणि वाहनांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत २ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
दारव्हा इथं गांज्याची विक्री करत असण्याच्या संशयावरून पोलिसांनी शेख इरफान शेख शब्बीरसह २ तरुणांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला. या घटनेनंतर एका तरुणाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एक गट आक्रमक झाला आणि त्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. पोलिसांच्या एका वाहनावर ही दगडफेक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरोडा येथील शेख इरफान शेख शब्बीरसह २ तरुणांना संशयास्पद वागणुकीवरून पोलिसांनी त्यांना दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन रोड चौफुलीवरून ताब्यात घेतले होते. हे तरुण गांज्याची विक्री करत असल्याचा संशय पोलिसांना आला होता.
यावरून इरफान संतप्त झाला आणि त्याने पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर पोलीस त्याला ठाण्यात घेऊन गेले. त्या नंतर इरफान याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहरातील काही तरुणांना माहिती झाली. त्यानंतर संतप्त तरुण पोलीस ठाण्यावर चालून गेले. त्या ठिकाणी दगडफेक केली. एवढेच नाही तर पोलिसांच्या एका वाहनावर सुद्धा दगडफेक केली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांच्या मारहाणीत इरफानचा मृत्यू झाला, त्यामुळे काही जण संतप्त झाले आणि ही घटना घडली अशी चर्चा आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Leave a Reply