गिरीश चौधरी यांच्या अटकेप्रकरणी भाजप आक्रमक

मुंबई : ७ जुलै – भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आताच्या सत्ताधाऱ्यांनीच सुरु केली होती. त्यामुळे ईडी आता याप्रकरणाचा तपास करत आहे. मुळात ‘कर नाही त्याला डर कशाला’? आता कुणाला काय सीडी लावायचेय ती त्यांनी लावावी, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.
ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांना उघडउघड आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा दिला होता. तुम्ही ईडी लावलीत तर मी सीडी लावेन, असे सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत अतुल भातखळकर यांनी एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले.
पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. चौधरी हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी १३ तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली होती. आता १२जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत असेल.
ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. दुसरीकडे, “भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे.

Leave a Reply