कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई: ७ जुलै- कृपाशंकर सिंह यांचा प्रवेश हा या पक्षातून त्या पक्षात झालेला नाही, तर हा प्रवेश एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत झाला असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांचं स्वागत केलं. आज बुधवारी कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्यावरील लेखसंग्रहाचं प्रकाशन अशा संयुक्त कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना मांडल्या . भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृपाशंकर सिंह जेव्हा काँग्रेसमध्ये होते, त्यावेळी त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. पण, ज्यावेळी त्यांना कळलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्नावर अंतिम उपाय शोधत आहेत आणि काँग्रेस त्याला विरोध करत आहे. त्यावेळी त्यांनी मोदींना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच काँग्रेसने जर समर्थन केलं नाही तर, मी पक्ष सोडेन असा इशाराही दिला. त्यावेळी त्यांच्यातला राष्ट्रवाद जागा झाला होता.
भाजपामध्ये सहभागी होण्यापूर्वी कृपाशंकर सिंह यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर काम केलं. जेव्हा त्यांनी पक्ष सोडला, त्यानंतरही ते लगेच भारतीय जनता पार्टीत सहभागी झाले नाहीत. त्यांनी जवळपास २०-२१ महिने काश्मीर प्रश्नावर काम केलं आणि साधारण दोन वर्षांनी ते भारतीय जनता पार्टीत आले आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply