शेतात वाघाने तीन तास ठिय्या दिल्याने मजूर भयभीत

यवतमाळ : ६ जुलै – झरी तालुक्यातील मांडवी शिवारात डॉ. रजणलवार यांच्या शेतात पट्टेदार वाघाने तीन तास ठिय्या दिला होता. शेतात काम करणासाठी गेलेल्या मजुरांना वाघ दिसतास भयभीत होऊन त्यांनी पळ काढला. मात्र, या वाघाने दहा ते पंधरा मजुरांचा हळुवारपणे पाठलाग केला. आणि शेतात ठिय्या दिला. या घटनेमुळे त्यामुळे शेत शिवरात जाणाऱ्या शेतकऱ्यांची काही काळ चांगलीच धावपळ उडाली. परिसरातील शेतकऱ्यांत आणि मजुरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सद्या खरीप हंगामातील शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतात मजुरांची गर्दी असते. पट्टेदार वाघ आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. या घटनेची माहिती झरी वनविभागाला देण्यात आल्यानंतर उशिराने कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी शेतातील नागरिकांनी या वाघाला हुसकाऊन लावले. या परिसरात तीन महिन्यापूर्वी ग्रामस्थवर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. महिला मजुरांनी याबद्दल संताप व्यक्त करीत वनविभागाने लक्ष देण्याची मागणी मजूरवर्गाकडून करण्यात आली आहे. वाघ दिसल्याने परिसरातील सर्व शेतकरी वर्गामध्ये दहशत पसरली आहे.

Leave a Reply