‘लाल परी’ अर्थात एसटीचे कामगार आंदोलन करणार

नागपूर: ६ जुलै-महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभारण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी दिली. केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पुणे येथे पार पडली. याप्रसंगी हा निर्णय घेण्यात आला.
महामंडळाने कामगार कराराप्रमाणे एसटी कामगारांना देय असणाऱ्या महागाई भत्त्याची तफावत अद्यापही दिली नाही, तातडीने ती द्यावी. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेला ५ टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांनाही मिळावा. एकतर्फी दिलेल्या वेतनवाढीच्या ४ हजार ८४९ कोटींपैकी उर्वरित रकमेचे वाटप तातडीने करून करार पूर्णत्वास न्यावा. सेवानिवृत्तांची थकबाकी एकरकमी देण्यात यावी, असे ठराव राज्य कार्यकारणीत मंजूर करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचा एक भाग म्हणून या संदर्भात तातडीने महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींना एसटी कामगारांकडून निवेदन देऊन आपली भूमिका विशद करावी, लोकप्रतिनिधींच्या मदतीने शासनावर दबाव निर्माण करावा हेही निश्चित केले गेल्याचे हट्टेवार यांनी सांगितले.

Leave a Reply