रशियात एक विमान बेपत्ता, होते २८ प्रवासी, समुद्रात कोसळल्याची शक्यता व्यक्त

नवी दिल्ली : ६ जुलै – रशियातील पूर्वेकडील भागात कामचटका द्वीपकल्पात सुमारे २८ लोक घेऊन जाणारे रशियन विमान बेपत्ता झाले, अशी माहिती आज (मंगळवार) प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका अहवालात देण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात आगमन झाल्यापासून हे विमान संपर्कात नाही.
वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, AN-26 विमानाने Petropavlovsk-Kamchatskya ते पलाना उड्डाण घेतले. त्यानंतर जेव्हा विमानाशी कोणताही संपर्क होत नव्हता, तेव्हा एजन्सींना त्याबद्दल कळविण्यात आले आहे.
रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, विमानात २२ प्रवासी होते. ज्यामध्ये एका मुलासह ६ क्रू मेंबर्स आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगसाठी तयार होत असतानाचं त्याचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. हे विमान कामचटका एव्हिएशन एंटरप्राइझचे आहे. विमान शोधण्यासाठी दोन हेलिकॉप्टर, एक विमान तैनात करण्यात आले आहे. जे विमानाच्या मार्गाचा शोध घेत आहेत.
विमाना अचानक बेपत्ता होण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु काही अहवालानुसार हे विमान समुद्रात कोसळल्याचे सांगितले जात आहे. आरआयए या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हे विमान समुद्रात कोसळले असेल किंवा क्रॅडल शहरालगत कोळशाच्या खाणीजवळ पडले असावे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

Leave a Reply