फिलिपाईन्समध्ये लष्करी विमानाचा अपघात, ८५ प्रवाशांपैकी ४० जणांना वाचविले

मनिला:४ जुलै- फिलिपाईन्स लष्कराच्या एका विमानाला आज रविवारी अपघात झाला. या विमानातून ८५ जण प्रवास करत होते. दक्षिण फिलिपाईन्समध्ये हा अपघात झाला असून, मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती लष्करप्रमुख सिरिलिटो सोबेजाना यांनी दिली. काही जणांना वाचवण्यात यश आले असल्याचेही दरम्यान समोर आले आहे.
लष्कर प्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी सांगितले की, सी-१३० चा अपघात झाला. विमान अपघात झाल्यानंतर आग लागली. मात्र, त्यातूनही ४० जणांना वाचवण्यात यश आले आहे. हे विमान जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना अपघातग्रस्त झाले.
सोबेजाना यांनी सांगितले की, हे विमान दक्षिणी कागायन डी ओरो शहरातून सैनिकांना घेऊन जात होते. सुलू प्रांतातील जोलो बेटावर विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र, धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती आहे. लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असतानाच विमानाला आग लागली.

Leave a Reply