गावाच्या आकाशात फिरताहेत ड्रोन, गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला

अकोला, ५ जुलै- अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात आकाशात दोन ड्रोन गावावरून घिरट्या मारत असल्याचे दिसताच गावकऱ्यांमध्ये विविध चर्चां सुरू झाल्या आहेत. नेमके हे प्रकरण काय, याबाबत प्रत्येक नागरिकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हिवरखेड परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास आकाशात दोन ड्रोन घिरट्या मारत असल्याचे नागरिकांना दिसून आले. परिसरात विमान वाहतूक अथवा इतर कुठल्याही प्रकारची हवाई वाहतूक नसल्याने सर्व गावकऱ्यांचे लक्ष गावावरून फिरणाऱ्या ड्रोनकडे वेधल्या गेले. नेमके हे काय आहे याबाबत विविध चर्चांना उधाण आले.
दरम्यान, जिल्ह्यात एमआयडीसी संदर्भात हवाई सर्व्हे सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हा आज रविवारीही असणार आहे. मात्र, अचानक आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे परिसरात चर्चेला नवा विषय मिळाला आहे.

Leave a Reply