कत्तलीसाठी नेणाऱ्या २६ गोवंशाची सुटका

चंद्रपूर: ५ जुलै- नागपूर जिल्ह्यातील गोवंशाची चंद्रपुरातील सिंदेवाही मार्गे तेलंगणात कत्तलीसाठी होत असलेली तस्करी पकडण्यात सिंदेवाही पोलिसांना यश आले. दोन ट्रक पकडून २६ गोवंशाची सुटका करण्यात आली. याप्रकरणी २३ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. नागपूर जिल्ह्यातील दोन ट्रकद्वारे तेलंगणात तस्करी केली जात असल्याची माहिती सहायक पोलिस उपअधीक्षक अनुज तारे यांच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. संशयित वाहन येताच त्यांची चौकशी केली असता, दोन्ही ट्रकमध्ये २६ गोवंश कोंबले होते. त्यांना गोवंश शाळेत हलविण्यात आले.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, सहायक पोलिस उपअधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश घारे, पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर, मंगेश श्रीरामे, अरविंद मेश्राम, विनोद बावणे यांनी केली.

Leave a Reply