पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे ११वे मुख्यमंत्री

डेहराडून : ३ जुलै – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर वेगवान राजकीय हालचाली झाल्या आहेत. भाजप आमदारांच्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांची मुख्यमंत्रिपदाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुष्कर सिंह हे उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांना उत्तराखंडच्या राजभवनमध्ये राज्यपाल राणी मौर्य मुख्यमंत्रीपदाची शपथ देणार आहेत.
पाच वर्षाच्या कार्यकाळात उत्तराखंडचा मुख्यमंत्री बदलण्याची तिसरी वेळ आहे. घटनात्मक पेचामुळे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
तीरथसिंह रावत यांनी १० मार्च रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते लोकसभेचे खासदारही आहेत. अशा परिस्थितीत तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ६ महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्यत्व घेण्याचा नियम होता. म्हणजेच त्यांना कोणत्याही विधानसभा जागेवरून पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत राज्यातील रिक्त जागांवर नजर टाकली तर गंगोत्री, हल्द्वानी विधानसभा जागा सध्या रिक्त आहेत. परंतु कोरोना परिस्थितीत या जागांवर पोटनिवडणूक घेणे अवघड दिसत आहे. त्यामुळे नेतृत्व बदलणे हा भाजपा हाय कमांडकडे एकच पर्याय उरला होता. सर्व समीकरणे लक्षात घेता उत्तराखंड राज्यात पुन्हा एकदा नेतृत्व बदलण्याचा निर्णय उच्च कमांडने घेतला आहे.

Leave a Reply