चंद्रपूर : २ जुलै – वेकोलि माजरी क्षेत्रातील एकोणा एक्स्टेंशनकरिता अधिग्रहीत केलेल्या बहुतांश शेतकर्यांरना अजुनपयर्ंत जमिनीचा मोबदला व नोकरी देण्यात आलेली नाही. जमिनीमध्ये सिंचनाची सुविधा असतांना या जमिनींना सिंचीतचा दर देण्यात आलेला नाही. एकोणा एक्स्टेंशन फार मोठा प्रकल्प असल्याने या प्रकल्पास गती देण्याची जबाबदारी वेकोलि व्यवस्थापनाची असतांना स्थानिक अधिकारी विशेषता संबंधीत अधिकारी या प्रकल्पास विलंब करीत असल्याबद्दल खेद व्यक्त करीत हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांचा मोबदला किंबहुना नोकरी संदर्भात कसल्याही प्रकारे छळ होणार नाही याची काळजी घेण्याची सुचना क्षेत्रीय महाप्रबंधक गुप्ता यांना केली.
क्षेत्रीय महाप्रबंधक यांचेशी प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी बैठकीमध्ये माजरी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधकांनी मोबदला व नोकरी बाबत विलंब झाल्याचे मान्य केले. येत्या १५ दिवसात संबंधीत प्रकल्पग्रस्तांचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे मागवून कार्यवाही केली जाईल. त्यानंतर येत्या दोन महिण्यात वेकोलि मुख्यालयास प्रस्ताव पाठवून मान्यतेची प्रक्रीया पूर्ण केली जाईल, तद्नंतर मेडीकलची कार्यवाही करू असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी चर्चा करतांना मान्य केले. सिंचीत जमिनीचा दर उपलब्ध करण्याकरीता उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सिंचीत जमिनीचा मोबदला देवू असे आश्वाीसनही अहीर यांना यावेळी क्षेत्रीय महाप्रबंधकांनी दिले.
स्थानिक युवकांवर अन्याय करणार्या. ओ.बी. कंत्राटदारांना तंबी द्या. माजरी क्षेत्रातील ओवरबर्डन (ओ.बी) चे काम करणारे संबंधीत ठेकेदार स्थानिक युवकांना कामावर घेत नसल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने या तक्रारींची त्वरीत दखल घेवून माहिती घ्यावी व सगळ्या ठेकेदारांना राज्य शासनाच्या जी.आर चे पालन करून ८0 टक्के स्थानिकांना या कामावर सामावून घेण्याकरीता वेकोलि प्रबंधनाने त्वरीत नोटीस काढुन आदेश द्यावेत अशी सुचनाही क्षेत्रीय महाप्रबंधकांना या चर्चेदरम्यान केली.
यावेळी वरीष्ठ अधिकारी कार्मिक प्रबंधक नायर, जोशी, धनंजय पिंपळशेंडे, छोटु पहापळे, एम.पी. राव, अंकुश आगलावे, राकेश तालावार, राहुल वनसिंगे, शुभम गेघाटे यांचेसह २00 हुन अधिक एकोणा प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते.