नाना पटोलेंचा नेमका निशाणा कुणावर – राजकीय वर्तुळात चर्चा

नागपूर : २ जुलै – नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या पत्रामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि सुभाष देसाई यांना लिहलेल्या पत्रात कोळसा वाशरीज संदर्भातील कंत्राट नियमांचा उल्लंघन करून, अनधिकृतपणे पदाचा गैरवापर करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यात ऊर्जा विभागाच्या नियंत्रणात काम करणाऱ्या महाजनकोला वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा पुरवण्यासाठी महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाने निविदा काढली होती. मात्र हा कंत्राट ज्या व्यक्तीला दिला गेला. तो ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. त्यामुळे थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या तक्रारीच्या पत्रात जरी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे थेट नाव नसले तरी खनिकर्म महामंडळाने या प्रकरणी नियमांची पायमल्ली करत राऊत यांच्या निकटवर्तीयाला कंत्राट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे खनिकर्म महामंडळ हे शिवसेनेचे निकटवर्तीय आमदार आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेत काम करतो. त्यामुळे नाना पटोले यांनी त्यांच्या पत्रातून नेमकं बोट कोणाकडे दाखवले आहे हा प्रश्न ही निर्माण झाला आहे.

नितीन राऊत हे ऊर्जा खात्याचे मंत्री असून महाजेनकोला कोळसा पुरवण्याचा कंत्राट राऊत यांच्या जवळच्या संजय हरदवाणी यांच्या रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आला आहे. तसेच यामध्ये रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असे कंत्राट मिळवण्यासाठी क्षमता, अनुभव यासंदर्भात सक्षम आहे का? असे प्रश्न ही नाना पटोले यांनी त्यांच्या पत्रात उचलले आहे. त्यामुळे नियम डावलून कोळसा पुरवठा आणि वाशरीजचे काम संजय हरदवाणी यांना का आणि कोणामुळे मिळाले असा? प्रश्न ही नाना पटोले यांच्या पत्रामुळे निर्माण झाला आहे.
कोळशाचे पुरवठा आणि वाशरीजच्या खनिकर्म महामंडळाच्या त्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी ही नाना पटोले यांनी पत्रातून केली आहे. पण या पत्रात ज्या संजय हरदवाणी यांना हा कंत्राट मिळाला आहे. ते नितीन राऊत यांचे निकटवर्तीय असून अनेक कार्यक्रमात ते राऊत यांच्यासोबत नागपुरात दिसतात. खनिकर्म महामंडळाने काढलेल्या निविदेत महाजनकोला कोळसा पुरवठा आणि कोळसा वाशरीज संदर्भात ज्या रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कंत्राट मिळाले आहे.. त्या कंपनीकडे कुठल्या ही नेटवर्थ, सेक्युरिटी क्लिअरन्स नाही, कोळसा वाशिंगचा अनुभव नाही, तसेच या कंपनी संयुक्त भागीदारी केलेली नाही. त्यांना नॅशनल ट्रीब्युनलने काळ्या यादीत टाकले असल्याचे म्हणत नाना पटोले यांच्या आरोपांना बळ मिळत आहे. या पत्रात त्यानी एकही वेळा नितीन राऊत याचे नाव किंवा ऊर्जा खाते असा शब्दाचा उल्लेख केलेला नाही. पण त्या व्यक्तीला कंत्राट दिल्यास परिणाम पुरवठयावर होईल आणि वीज उत्पादनावर होईल असेही मांडण्यात आले आहे.
राजकीय क्षेत्रात एकप्रकारे खळबळ उडाली आहे. यात काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपुस असल्याची चर्चा आहे. तसेच नाना पटोले यांनीं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला नंतर उर्जाखाते दिले जाईल आणि नितीन राऊत याना विधानसभा अध्यक्षपद दिले जाईल असे फेरबदल होणार अशी चर्चा रंगू लागली. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत हे दिल्लीवारी सुद्धा करून आले. यामुळे आता हा आरोप नितीन राऊत यांच्या खात्याशी संबंधित नसला तर निकटवर्तीय यांच्यावर झाल्याने नक्कीच धुसपुस असल्याचे बोलले जात आहे. दुसरे यात हे आरोप खनिकर्म विभागाला धरून झाल्यास या महामंडळाचे अध्यक्ष हे आशिष जयस्वाल आहे. यासोबत ते शिवसेनेची निकटवर्तीय आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. यामुळे महाविकास आघाडीत धुसपुस तर नाही असे प्रश्न मात्र पुन्हा अनुत्तरित आहे. पण पुढील काही दिवस राजकीय वातावरण शांत होणार की ढवळून निघणार हे पाहावे लागतील.

Leave a Reply