पंतप्रधानांनी दिल्या डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : १ जुलै – तसं डॉक्टरांना देवच मानलं जातं. पण कोरोना काळात याचा प्रत्यय अधिक आला. कित्येक डॉक्टर आपलं घरदार विसरून रुग्णसेवा करताना दिसले. आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून रुग्णांसाठी दिवसरात्र झटू लागले. जवळपास दीड वर्षे आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी ते दोन हात करत आहेत. आज डॉक्टर्स दिनानिमित्त तर त्यांना एक सॅल्युट बनतोच. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या डॉक्टरांसमोर नतमस्तक झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स दिनानिमित्त देशातील डॉक्टरांशी संवाद साधला. त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला भारतातील सर्व नागरिकांच्या वतीने सर्व डॉक्टरांचे आभार मानायचे आहेत. आज देश कोरोनासारखा मोठा लढा देत आहेत. डॉक्टर्स दिवसरात्र मेहनत करून लाखो लोकांचं जीवन वाचवत आहेत. डॉक्टरांना ईश्वराचं दुसरं रूप म्हटलं जातं ते असंच नाही”
“पुण्य कार्य करताना देशातील किती तरी डॉक्टरांनी आपलं जीवनही गमावलं आहे. मी त्यांना श्रद्धांजली अपर्ण करतो. त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो”, असं मोदी म्हणाले.

Leave a Reply