देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याची चर्चा जोरात

नवी दिल्ली:१ जुलै- सध्या देशातील कोरोना परिस्थिती सुधारत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या या विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याच्या नावाची सध्या चर्चा सध्या दिल्लीत सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनाही केंद्रातील मंत्रीमंडळात स्थान दिले जाऊ शकते. फडणवीस यांच्याकडे रेल्वे किंवा ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सोपवला जाण्याची शक्यवता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी २९ जूनला दिल्ली दौरा केला होता. त्यात त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांना केंद्रात बोलवण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ओडिशामधून बैजयंत पांडा यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply