अजित पवारांविरोधात नाशिकमध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक

नाशिक:१ जुलै: संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आज गुरुवारी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे दाखवण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आहेत.
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. राज्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत. दरम्यान, अजित पवारांविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मराठा कार्यकर्ते अजित पवारांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र, पोलिसांनी ताफा येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Leave a Reply