ब्राझील सरकार करणार भारत बायोटेकशी केलेला करार रद्द

नवी दिल्ली: ३० जून-ब्राझील सरकारनं लससाठी भारत बायोटेकशी केलेला ३२.४ कोटी डॉलरचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत बायोटेकला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष जैअर बोलसोनारो यांच्याविरोधात अनियमिततेच्या आरोपानंतर देशाने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो किरोगा यांनी ही माहिती दिली.
ब्राझीलमध्ये या करारावर बरेच प्रश्न उपस्थित होत होते, त्यानंतर आता ३२ कोटी डॉलर्सचा हा करार रद्द करण्यात आला आहे. या करारानुसार, ब्राझील हा भारत बायोटेककडून एकूण २० कोटी लसीचे डोस खरेदी करणार होता. मात्र, ब्राझीलमध्ये या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांच्यावर भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत लसींसाठी केलेला करार स्थगित राहील. दरम्यान, ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून वारंवार दावा केला जात आहे की, या करारात कोणताही गैरप्रकार करण्यात आलेला नाही.

Leave a Reply