४ जुलैपासून नागपूर -बिलासपूर रेल्वे सुरू होणार


गोंदिया:२८ जून- रेल्वेची विस्कटलेली स्थिती पूर्वपदी येऊ लागली आहे. प्रवाशांची मागणी व प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देता यावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेगाड्यांच्या संचालनाला हिरवा कंदील दाखवण्यात येत आहे. येत्या ४ जुलैपासून नागपूर (इतवारी) -बिलासपूर इंटरसिटी व शिवनाथ एक्सप्रेस पुन्हा धावणार आहे. नागपूर ते रायपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी इंटरसिटी एक्सप्रेस महत्त्वाची मानली जाते.
कोरोना संसर्गामुळे ही रेल्वेगाडी बंद करण्यात आली होती. इंटरसिंटी सुपरफास्ट एक्सप्रेस दररोज धावणार आहे. ही गाडी दुपारी ३.५० वाजता बिलासपूर येथून सुटेल. ती इतवारी रेल्वेस्थानकावर रात्री ११.५५ वाजता पोहचेल.

Leave a Reply