चिमूरच्या धावपटूची राष्ट्रीय दौड स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी

चंद्रपूर: २७ जून- भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद असलेल्या चिमुरच्या विक्रमने नव्याने एका विक्रमाला गवसणी घालत क्रांतिनगरीच्या शिरपेचात नवा तुरा रोवला आहे. यापूर्वी अनेक दौड स्पर्धा आपल्या नावाने करणाऱ्या या धावपटूने नुकतीच पटियाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय दौड स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आणि पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात प्रबळ दावेदारी दाखल केली.
सुमारे १२ वर्षांपूर्वी मोठय़ा भावाच्या प्रोत्साहनामुळे त्याने जोमाने सरावाला सुरवात केली. काही दिवस नागपुरात रवींद्र टोंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या विक्रमने सुवर्ण पदकाला गवसणी घालत १० हजार मीटर अंतर ३० मिनिटे १६.४४ सेकंदात पूर्ण केले.

Leave a Reply