अकोला जिल्ह्यात ७० हजार शेतकर्‍यांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित

अकोला :२७ जून- टाळेबंदीच्या काळात बँक कामकाजाच्या वेळा कमी असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांचे पीक कर्ज मंजूर झाले नाहीत. अद्यापही सुमारे ७० हजार शेतकऱ्यांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरू झाली. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने टाळेबंदी घोषित केली. या टाळेबंदीत बँकांच्या कामकाजाच्या वेळा कमी होत्या. याच दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी विविध बँकांमध्ये अर्ज केले होते.
बँकेच्या कमी असलेल्या वेळांमुळे पीक कर्जाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित राहिले. त्यातच विविध बँकांच्या प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा मुख्यालयात शेतकऱ्यांना येणे आवश्यक होते. मात्र, या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीला बंदी असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली.
दरम्यान, प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जिल्ह्यातील विविध बँकांनी कर्ज वितरण केले, तरीही अनेक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. या कर्ज प्रकरणाला गती मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Leave a Reply