हेमंत करकरे देशभक्त नाहीत – साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान

भोपाळ: २६ जून- आपल्या विधानांनामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ”जे खरोखर देशभक्त आहेत, ते हेमंत करकरेंना देशभक्त म्हणत नाहीत.” असं त्यांनी म्हटलं आहे. या खळबळजनक विधानाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

माझे गुरूजी ज्यांनी मला इयत्ता आठवीत शिकवलं, त्यांची हेमंत करकरे यांनी बोटं तोडली. भीती निर्माण करण्यासाठी ही बोटं तोडली. हे कशासाठी होतं, हे लोकशाहीला धरून होतं का?” असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलेलं आहे. मालेगाव स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी अटक केली होती, हे येथे उल्लेखनीय.

Leave a Reply