मंदिरांच्या सत्तेवरून
बडव्यांत लागलं भांडण !
प्रत्येकाला हवं होतं
अधिक उत्पन्न देणारं आंदण !
सारी कुरणं वाटून घेतल्यावर
दिसला मंदिरांचा गल्ला !
गल्ल्यासाठी सुरू केला
त्यांनी एकच गिल्ला !
अखेर त्यांच्यातल्या तोडपाणीपटू काकांनी
त्यांच्यात केली दिलजमाई!
एकाला दिली त्यांनी शिर्डीची मलाई !
दुसऱ्याच्या वाट्याला पंढरीची चराई !
तर तिसर्याच्या ताटात आली सिद्धीविनायकाची कमाई !
अशा रितीने काकांनी
कुरणं दिली वाटून !
देवांचीही दुकानं
चेल्यांना दिली थाटून !
मंदिरं बंद असली तरी
यांच्या भक्तीत नाही कमी !
मंदिरात सुद्धा दिसते यांना
कमाईची हमी !
देव यांचा पैसा ,धर्मही यांचा पैसा !
जैसा ज्याचा भाव देव त्याचा तैसा !
कवी -- अनिल शेंडे .