२६ जूनला भाजपतर्फे राज्यात १ हजार ठिकाणी चक्काजाम – चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

बुलडाणा : २४ जून – ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी २६ जूनला राज्यभरात भाजपतर्फे १ हजार ठिकाणी चक्का जॅम आंदोलन करण्यात येणार, अशी माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलडाण्यातील खामगावात दिली.
महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयात माहिती दिली नाही, त्यामुळे आरक्षण रद्द झाले. येत्या ३ महिन्यांत सरकारने आरक्षणाबाबत न्यायालयाला डेटा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. त्यांच्यासोबत बुलडाणा जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार विजयराज शिंदे उपस्थित होते.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप करीत, फडणवीस सरकारच्या अद्यादेशाला राज्यसरकारने वेळेत मुदतवाढ न दिल्यानेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले असल्याचेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
ओबीसी आरक्षणासंदर्भात फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात मजबूत बाजू मांडली. मात्र, उद्धव ठाकरे सरकार फक्त राजकारण करण्यात मग्न आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

Leave a Reply